Nashik News: प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) ते नागपूर आणि पुणे ते नागपूर दरम्यान मध्य रेल्वे विशेष गाड्या चालवणार आहे. या अतिरिक्त गाड्यांमुळे रेल्वेना प्रवाश्यांना फायदा होणार आहे. सध्या उन्हाळी सुट्ट्यामुळे रेल्वे गाडयांना गर्दी असून अतिरिक्त रेल्वे गाड्या धावणार असल्याने प्रवाश्यांची गैरसोय टळणार आहे.
अतिरिक्त गाड्यांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. एलटीटी – नागपूर विशेष गाडी (क्र.०१०२१) ३ एप्रिलला एलटीटी येथून ००.५५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी १५.४५ वाजता पोहोचेल. तर नागपूर-एलटीटी विशेष गाडी (क्र.०१०२२) ३ एप्रिलला नागपूर येथून २०.०० वाजता सुटेल आणि एलटीटी येथे दुस-या दिवशी ११.४५ वाजता पोहोचेल.
या गाडयांना ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा असे थांबे आहेत, तसेच त्याची संरचना- १ वातानुकूलित द्वितीय, ६ वातानुकूलित तृतीय, ९ शयनयान, ४ सामान्य द्वितीय आणि १ सामान्य द्वितीय श्रेणी-सह-गार्ड ब्रेक व्हॅन.
पुणे – नागपूर विशेष गाडी (२ सेवा)
गाडी क्रमांक ०१४६७ ही ३ एप्रिलला पुणे येथून १५.५० वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ०६.३० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१४६८ विशेष गाडी ४ एप्रिलला नागपूर येथून ०८.०० वाजता सुटेल आणि पुणे येथे त्याच दिवशी २३.३० वाजता पोहोचेल.
या गाडीला उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा. संरचना: २ वातानुकूलित द्वितीय, ४ वातानुकूलित तृतीय, ८ शयनयान, ४ सामान्य द्वितीय आणि १ सामान्य द्वितीय श्रेणी आदी थांबे आहेत.











