होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Summer Skin Care Tips: उन्हाळ्यात रात्री लावा ‘या’ पदार्थांचा फेस मास्क, दुसऱ्या दिवशी त्वचा राहील ताजीतवानी

On: March 25, 2026 4:22 PM
Follow Us:
---Advertisement---

Summer Skin Care Tips: सध्या उन्हाळा सुरु आहे. उन्हाळ्यात आरोग्याशी संबंधीत अनेक समस्या निर्माण होत असतात. यात त्वचेसंबंधी समस्या प्रामुख्याने जाणवते. उन्हाळ्यात त्वचेला दुहेरी फटका बसतो. एकीकडे तीव्र सूर्यप्रकाश आणि उष्णता, तर दुसरीकडे धूळ आणि घाणीचा थर साचल्यामुळे त्वचा निस्तेज दिसते. त्यामुळे, उन्हाळ्यात त्वचेची विशेष काळजीची घेतली पाहीजे. उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी बाजारात अनेक उत्पादने उपलब्ध आहेत, मात्र, या उत्पादनांमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल्सचा वापर केलेला असतो. ज्याचे भविष्यात दुष्परिणाम दिसून येतात. आजचा हा लेख त्याच विषयावर असून आम्ही तुम्हीला उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी याचे घरगुती उपाय सांगणार आहोत. रात्री या घरगुती उपायांनी त्वचेची काळजी घेतल्यास दुसऱ्या दिवशी त्वचा ताजीतवानी राहते. रात्रीच्या वेळी त्वचेची काळजी घेतल्याने त्वचेचा पोत सुधारण्यास फार मोठी मदत होते. कारण, या वेळेत आपल्या त्वचेला योग्य प्रकारे आराम मिळतो.

 

उन्हाळ्यात त्वचेच्या काळजीसाठी अशी ठेवा दिनचर्या

उन्हाळ्यात तुम्हाला त्वचेची काळजी घ्यायची असेल तर तुम्हाला तुमच्या दिनचर्येवर लक्ष द्यावे लागेल. त्यानुसार, उन्हाळ्यात शरीरातील पाण्याच्या प्रमाणावर लक्ष केंद्रित करा. उष्ण हवामानामुळे घाम येणे सामान्य आहे. तथापि, शरीरातील पाण्याचे प्रमाण राखणे आवश्यक आहे. जर योग्य लक्ष दिले नाही, तर निर्जलीकरणामुळे समस्या निर्माण होऊ शकतात. याचा आरोग्य आणि त्वचेवर मोठा परिणाम होत त्वचा निस्तेज होते. त्वचेतील कोरडेपणा टाळण्यासाठी काकडी, टोमॅटो, टरबूज, खरबूज आणि इतर पाणीदार पदार्थांचे सेवन करा. यासह काही पदार्थांचा फेस मास्क तुम्ही वापरू शकतात. तुमची त्वचा आर्द्र ठेवण्यासाठी तुम्ही कोणते फेस मास्क वापरू शकता जाणून घ्या.

 

हे आहेत सर्वोत्तम घरगुती फेस मास्क

कोरफड जेल मास्क – आयुर्वेदात कोरफडचे अनेक औषधी गुणधर्म सांगितले आहे. त्वचेसाठी देखील कोरफड खूप लाभदायक आहे. कोरफड जेल मास्क हा एक असा मास्क आहे जो सर्व प्रकारच्या त्वचेला सूट होतो. दररोज रात्री झोपण्यापूर्वी कोरफड जेल त्वचेवर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. झोपण्याच्या अर्धा तास आधी ते धुवून टाका आणि मॉइश्चरायझर लावा. तुम्ही कोरफड जेल मास्क रात्रभर देखील लावून ठेवू शकता. हे त्वचेला मॉइश्चराइझ करते आणि त्याच्या अँटीबॅक्टेरियल गुणधर्मांमुळे मुरुमाची समस्या कमी होते.

 

कच्च्या दुधाचा मास्क – कच्चे दुध हे त्वचेसाठी वरदान आहे. दुधातील लॅक्टिक ॲसिडमुळे त्वचेला नैसर्गिकरित्या चमक येते. कच्च्या दुधाचा मास्क बनविण्यासाठी एका वाटीत कच्चे दूध घ्या, त्यात कापसाचा बोळा भिजवा आणि तो तुमच्या त्वचेवर लावा. संपूर्ण चेहऱ्यावर लावल्यानंतर, ते सुकल्यावर पुन्हा लावा. तुम्ही ते रात्रभर तसेच ठेवू शकता. हा कच्च्या दुधाचा मास्क त्वचेचा काळपटपणा कमी करतो आणि त्वचेला नैसर्गिक चमक आणतो.

 

तांदूळ आणि मध – तांदूळ आणि मधाचा फेस मास्क बनवण्यासाठी भिजवलेले तांदूळ वाटून घ्या आणि त्या पेस्टमध्ये थोडे मध घाला. दोघांचे मिश्रण व्यवस्थित एकजीव करा. त्यानंतर हा फेस मास्क झोपण्यापूर्वी लावा आणि १० ते १५ मिनिटे तसाच राहू द्या. त्यानंतर, तुमच्या आवडत्या क्रीमने त्वचेला मॉइश्चराइझ करा. तांदूळ तुमची त्वचा उजळ करण्यास मदत करतो, तर मध त्वचेला मॉइश्चराइझ करतो.

(डिस्क्लेमर : सदरचा लेख हा उपलब्ध स्रोतनुसार आहे. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment