होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

---Advertisement---

प्रवाशांनो लक्ष द्या! लोकमान्य टिळक टर्मिनस – धनबाद विशेष गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ

On: March 28, 2026 4:59 PM
Follow Us:
---Advertisement---

Indian Railways: मध्य रेल्वेकडून प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन, ‘लोकमान्य टिळक टर्मिनस- धनबाद’ विशेष गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तपशीलांनुसार या गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये आणखी 02 सेवांची वाढ करण्यात येणार आहे.

प्राप्त माहितीनुसार, ट्रेन क्रमांक 03380 लोकमान्य टिळक टर्मिनस – धनबाद साप्ताहिक विशेष गाडी, जी यापूर्वी दर गुरुवारी 26 मार्च 2026 पर्यंत चालविण्यात येईल असे सूचित करण्यात आले होते, तिचा कालावधी आता 02 एप्रिल 2026 पर्यंत वाढवण्यात आला आहे. म्हणजेच या गाडीची 1 फेरी वाढवण्यात आली आहे.

तर ट्रेन क्रमांक 03379 धनबाद – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष गाडी, जी यापूर्वी दर मंगळवारी 24 मार्च 2026 पर्यंत चालविण्यात येईल असे सूचित करण्यात आले होते, तिचा कालावधी आता 31 मार्च 2026 पर्यंत वाढवण्यात आला आहे. म्हणजेच या गाडीची 1 फेरी वाढवण्यात आली आहे. या गाड्यांच्या वेळा आणि थांब्यांमध्ये कोणताही बदल होणार नाही.

गाड्यांची संरचना- दोन वातानुकूलित द्वितीय, 2 वातानुकूलित तृतीय, 6 वातानुकूलित तृतीय इकॉनॉमी, 6 शयनयान श्रेणी, 4 सामान्य द्वितीय, 1 द्वितीय आसन श्रेणी-सह गार्ड ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर डबा.

आरक्षण – विशेष ट्रेन क्रमांक 03380 च्या विस्तारित फेऱ्यांसाठीचे आरक्षण 29 मार्च 2026 रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि रेल्वेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असेल.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment