होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Ladki Bahin Yojana: महिलांनो लक्ष द्या! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी दुरुस्तीला मुदतवाढ; नवी तारीख जाहीर

On: April 1, 2026 5:11 PM
Follow Us:
---Advertisement---

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसी दुरुस्तीसाठी 30 एप्रिलपर्यंत मुदत वाढवत देण्यात आली आहे. या योजनेच्या ई केवायसीसाठी यापूर्वी 31 मार्चपर्यंत मुदत होती. आता ही मुदत एक महिन्यानं वाढवण्यात आली आहे, असं आदिती तटकरेंनी म्हटलं आहे.

राज्य सरकारकडून जुलै 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ दरमहा 1500 रुपयांप्रमाणं महिलांना दिला जातो. आता लाडक्या बहिणींना ई केवायसी दुरुस्तीसाठी आणखी एक संधी उपलब्ध झाली आहे.

दरम्यान, प्रसार मध्यमांनी भोंदू अशोक खरात प्रकरणाबाबत विचारले असता, या प्रकरणावरुन सरकारवर केली जाणारी टीका अतिशय दुर्दैवी आहे. मी ज्यावेळी हे प्रकरण झालं तेव्हा सर्व प्रथम प्रतिक्रिया देणाऱ्यांपैकी मी एक होते, असं आदिती तटकरे यांनी म्हटलं. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात एसआयटी स्थापन केलेली आहे. एसआयटीच्या प्रमुख अनुभवी महिला पोलीस अधिकारी आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जी भूमिका आहे तीच माझी भूमिका आहे. ज्या महिलांवर अन्याय झाला, पीडित महिलांना न्याय देणं महत्त्वाचं आहे. जे कोणी दोषी असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, असं आदिती तटकरेंनी म्हटलं.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment