होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

---Advertisement---

जिल्हयात हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा; हिंदु जनजागृती समितीच्या वतीने 40 ठिकाणी गदा पूजन!

On: April 2, 2026 7:43 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: शहर परिसरात आज सकाळपासूनच हनुमान जयंतीनिमित्त मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी होती, श्री. रामभक्त हनुमान की जय, बोलो हनुमान की जय अशा जयघोषाने शहर परिसर दणाणून सोडला होता. आज श्री हनुमान जयंती निमित्ताने शहरासह ग्रामीण भागातील एकूण 40 श्री हनुमान मंदिरात “गदा ” पूजनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी सकाळी 6 वाजता पंचमुखी हनुमान मंदिरात जन्मोत्सव सोहळ्यात भाविकांच्या उपस्थितीत गदा पूजन झाले.

त्यानंतर श्री. अन्नदाता हनुमान मंदिर दानाबाजार या ठिकाणी भाजप प्रदेश राज्य सचिव भैरवी पलांडे, दानाबाजार व्यापारी असोसिएशनचे अशोक धूत, नगरसेवक विजय बांदल, राजेंद्र पांडे, दिनेश तिवारी, हिंदु जनजागृती समितीचे निखिल कदम, भाजप युवा मोर्चाचे हर्षल सिखवाल यावेळी उपस्थित होते. असोदा येथील जागृत देवस्थान समिती, श्रीराम पेठ येथील हनुमान मंदिरात गदा पूजन करण्यात आले यावेळी 400 हुन अधिक भाविक उपस्थित होते, याच प्रमाणे, श्रीधर नगरातील जागृती हौसिंग सोसायटी,सुप्रीम कॉलनी, चौगुले प्लॉट, छत्रपती शिवाजी महाराज नगर, अयोध्या नगर, भोईटे नगर, खोटे नगर, midc, आणि अष्टविनायक माता मंदिर, पिंप्राळा, याठिकाणी गदा पूजनाचे आयोजन करण्यात आले होते.

शहरातील काही मंदिरामध्ये हनुमान चालिसा पाठ झाला, हार, फुले अर्पण करून श्री रामभक्त हनुमान यांचे स्मरण करण्यात आले, शक्ती आणि भक्तीचा दाता श्री बजरंगबली याची दिवसभर उपासना करण्यात आली. ठिकठिकाणी प्रतिमा पूजन करण्या आले, तसेच गोलाणी मार्केट येथे प्रतिमा पूजन करण्यात येऊन भंडारा कार्यक्रम ठेवला होता, यावेळी अन्नदानाचा हनुमान भक्तांनी लाभ घेतला. यावेळी पवनपुत्र हनुमान की जय असा एकच जयघोष करण्यात आला.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment