होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; पिस्तूलातून गोळी झाडून केली आत्महत्या

On: April 19, 2026 5:53 PM
Follow Us:
---Advertisement---

Bhadgaon News: भडगाव मधील खुशाल आप्पा नगर येथील रहिवासी (२२) वर्षीच्या तरुणाने गावठी पिस्तूलातून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. सदर मयत तरुणाचे नाव स्वप्निल प्रवीण शिंपी असे असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

स्वप्निल हा सकाळी आपल्या कुटुंबीयांसोबत आणि मित्रांसोबत वेळ घालवत होता, मात्र, दुपारच्या सुमारास त्याला मोबाईलवर एक कॉल आला. हा कॉल आल्यानंतर स्वप्निल अचानक अस्वस्थ झाला. कोणालाही काहीही न सांगता तो आपल्या खोलीत गेला, त्याने एकदम टोकाचे पाऊल उचले, त्याने आतील बाजूने दरवाजा बंद केला आणि काही क्षणांतच खोलीतून गोळी झाडल्याचा आवाज आला. अचानक झालेल्या या आवाजाने सर्वांचे लक्ष वेधले,गोळीबारीचा आवाज मोठा होता. कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी धाव घेत खिडकीतून आत पाहिले तर स्वप्निल रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. कुटुंबियांना मोठा धक्का बसला, त्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने दरवाजा तोडून त्याला बाहेर काढले आणि उपचारासाठी भडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला तात्काळ जळगाव जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या गोळीबाराच्या घटनेची माहिती भडगाव पोलिसांनी मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून गावठी पिस्तूल आणि स्वप्निलचा मोबाईल फोन ताब्यात घेतला. स्वप्निलला नक्की कोणाचा फोन आला होता आणि तो इतका अस्वस्थ का झाला, नेमके काय झाले असावे असा तर्कवितर्क नागिरकांमध्ये लावले जात होते. मात्र नेमके कारण समजू शकले नाही. पोलीस तपासानंतर खरे आत्महत्येचे गूढ उकलले जाईल. पोलीस मोबाईलचे लॉक उघडून या घटनेमागील कारणाचा तपास लावत आहे. या घटनेचा पुढील तपास भडगाव पोलीस करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment