होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

अंगावर काटा आणणारी घटना! एकच फ्लॅटफॉर्मवर दोन लोकल समोरा समोर येतात तेव्हा..

On: April 21, 2026 6:28 PM
Follow Us:
---Advertisement---

Mumbai News: अंगावर काटा आणणारी घटना नुकतीच समोर आली आहे, एकाच फ्लॅटफॉर्मवर दोन लोकल समोरा समोर आल्याने काही काळ स्थानकाबरील प्रवाश्यांचा जीव भांड्यात पडला होता. (CSMT) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मोठा रेल्वे अपघात टळला. डोंबिवली येथील दोन दिवसापुरवी घडलेल्या दुर्घटनेनंतर ही दुसरी घटना होती. मात्र सुदैवाने कुठलीही हानी झाली नसल्याने सर्वानीच सुटकेचा निश्वास सोडला.

घटना आधी आहे

बदलापूरहून येणारी फास्ट लोकल आपल्या नियोजित वेळेत ४ नंबर ऐवजी अचानक ५ नंबर प्लॅटफॉर्मकडे वळून आली, परंतु त्या प्लॅटफॉर्मवर आधीच एक लोकल थांबलेली होती.एकच फ्लॅटफॉर्मवर दोन लोकल गाड्या समोरासमोर आल्याने बघणारे प्रवाशी काही काळ हादरले. समोर दुसरी लोकल दिसल्यावर येणाऱ्या लोकलच्या मोटरमनने प्रसंगावधान राखत लागलीच ब्रेक दाबून गाडी थांबवली. या दोन्ही गाड्यांमध्ये थोडेच अंतर शिल्लक होते अन्यथा मोठा अनर्थ घडला असता, मात्र मोटरमनच्या समयसूचकतेचे मोठी दुर्घटना टळली.

दरम्यान लोकलच्या अपघाताच्या घटना सातत्याने समोर येत आहेत, दोन दिवसांपूर्वीच डोंबिवली येथे एक लोकल ट्रेन ट्रॅक वरून उतरल्याने अपघात झाला, त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक काही काळ खोळंबली होती. मुंबईमध्ये अशा घटना घडत असतात, मात्र लागोपाठ अशा घटना समोर येत असल्याने लोकल सेवेच्या परिचालनाचा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली. बदलापूरहून आलेली लोकल मागे घेण्यात आली, तर ५ नंबर प्लॅटफॉर्मवरील लोकलला दुसऱ्याकडे वळविण्यात आले. त्यानंतर संबंधित लोकलला योग्य प्लॅटफॉर्मवर आणण्यात आले. मात्र या प्रकारामुळे काही काळ स्थानकावरील रेल्वेच्या परिचालनावर परिणाम झाला.

या घटनेमुळे सीएसएमटी स्थानकावरील रेल्वे वाहतुकीवर परिमाण झाला होता. येथील प्लॅटफॉर्म काही काळ बंद ठेवण्यात आले. दुपारी झालेल्या याघटनेने . लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला, त्यामुळे अनेक लोकल गाड्या उशिराने धावत होत्या. दरम्यान घटनेमागे तांत्रिक बिघाड असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या सलग बिघाडांमुळे सकाळपासूनच लोकल गाड्या उशिराने धावत होत्या. त्यातच सीएसएमटीतील या गंभीर घटनेमुळे संपूर्ण वेळापत्रक कोलमडले. प्रवाशांना गर्दी, उशीर आणि गैरसोयीचा सामना करावा लागला असून रेल्वे प्रशासनावर नाराजी दर्शवली.

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment