होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

कसारा लोकल लाईनवर मंगळवारपासून मेगा ब्लॉक; कसारा- सीएसटी लोकल ‘या’ स्थानकावरून सुटणार..

On: May 31, 2026 6:27 PM
Follow Us:
---Advertisement---

Central Railway News: मध्य रेल्वेतर्फे मुंबई विभागातील ओव्हरहेड इक्विपमेंट कामासाठी अडथळा दूर करण्याची पूर्वतयारी केली जात आहे. त्यासाठी कसारा येथे मंगळवार ते शुक्रवार दि.२ ते ५ जून पर्यंत दररोज दुपारी २ तास विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेणार आहे. त्यामुळे अप लाईन, मिड लाईन, अप यार्ड लाईन, थळ घाट रिव्हर्सल केबिन आणि खर्डी दरम्यान प्लॅटफॉर्म २, ३ आणि ४ (दोन्ही स्थानके वगळून) मेगा ब्लॉक राहणार आहे.

मंगळवार ते शुक्रवारपर्यंत या ब्लॉक कालावधीत आसनगाव आणि कसारा दरम्यान लोकल रेल्वेगाडी सेवा उपलब्ध राहणार नाही. या कालावधीत उपनगरीय गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन/ शॉर्ट ओरीजनेशन असे- मुंबई सीएसटी येथून १३.१०, १४.१७ आणि १४.४६ वाजता सुटणा-या सीएसटी – कसारा लोकल (एन १९, एन २१, एन २३) येथेच शॉर्ट टर्मिनेट केली जाईल.

कसारा- सीएसटी उपनगरीय सेवा खालीलप्रमाणे आसनगाव येथून सुटतील, कसारा येथून १५.३५ वाजता सुटणारी एन २४ लोकल आसनगाव येथून १६.१२ वाजता सुटेल. कसारा येथून १६.१६ वाजता सुटणारी एन २६ लोकल आसनगाव येथून १६.५४ वाजता सुटेल. कसारा येथून १७.०२ वाजता सुटणारी एन २८ लोकल आसनगाव येथून १७.३९ वाजता सुटेल

मंगळवार ते शुक्रवारपर्यंतच्या ब्लॉकच्या आधी आणि नंतरची शेवटची आणि पहिली लोकल कसारासाठी ब्लॉकच्या आधीची शेवटची उपनगरीय सेवा एन १७ मुंबई सीएसटी-कसारा असेल, जी सीएसटी येथून १२.३० वाजता सुटेल. सीएसटीसाठीची ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल एन २२ कसारा-सीएसटी कसारा येथून १४.४२ वाजता सुटेल. कसारासाठीची ब्लॉकनंतरची पहिली लोकल एन २५ मुंबई सीएसटी-कसारा असेल. ती सीएसटी येथून १६.५० वाजता सुटेल. मुंबई सीएसटीसाठीची ब्लॉकनंतरची पहिली लोकल एन ३० कसारा-सीएसटी कसारा येथून १८.१७ वाजता सुटेल.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment