Jalgaon News: जळगावमध्ये एमडी ड्रगची विक्री करून अल्पवयीन मुलांना व्यसनाच्या आहारी लावून नशेत असतांना त्यांचा फायदा उचलून त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या टोळीचा जळगाव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणातील मुख्य ड्रग्ज डीलरला अटक केली आहे. पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणात एक एक साखळी जोडत मुख्य सूत्रधाराला बेड्या ठोकल्याने ड्रग तस्करांची पाळेमुळे खोदून काढण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. या कारवाईत आतापर्यंत आरोपीकडून सुमारे ६ लाख रुपये किमतीचे ‘एमडी’ (मेफेड्रोन) हे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. विशेषतः हाय प्रोफाइल पार्ट्यांमध्ये ते वापरले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन अत्याचार प्रकरणाला एक वेगळी किनार दिसून येत आहे. ड्रग्ज तस्कर रॅकेट चालवण्यासाठी अल्पवयीन मुलांना हेरून त्यांना आपल्या जाळ्यात ओढत आणि त्यानंतर त्यांना ड्रगचे व्यसन लावायचे, एकदा ते ड्रगच्या आहारी गेले की नशेत असतांना त्यांच्यावर अत्याचार करायचे प्रथमदर्शनी तरी हे प्रकरण याच प्रकरातील दिसत आहे. त्यामुळे गुन्हेगारांचे मनसुबे वाईटच असतातच याच शंकेतून पोलिसांनी हे प्रकरण गांभीयाने घेतले आहे, ड्रग्ज नेटवर्कची पाळेमुळे खोदून काढण्यासाठी पोलिसांनी तीन स्वतंत्र पथके तयार केली आहे. पोलिसाने अटक केलेल्या आरोपीकडून आणखी ड्रग तस्करी आणि त्यांच्या रॅकेटविषयी अधिक तपास करून एक एक साखळी जोडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातीळ तिघांना पोलिसांनी अटक केल्यावर त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पोलिसांनी शौफिक सय्यद आरिफ आणि रईस हरून सेफुद्दीन शेख, गुलाम अकबर शेख रईस पटेल या तिघांची कसून चौकशी केली. या दरम्यान आरोपींनी त्यांना ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या मुख्य म्होरक्याचे नाव सांगितले आहे. त्यानंतर गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित ड्रग्ज पुरवठादारावर पाळत ठेवली आणि सापळा रचून त्याला रंगेहात ताब्यात घेतले. आरोपीकडून सुमारे ६ लाख रुपये किंमतीचे एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. तो या ड्रग्जची विक्री नेमकी कुठे आणि कोणामार्फत करत होता. त्याचे ग्राहक कोणकोणते आहेत, त्याच्या टोळीचे मेंबर किती आहे. या सर्व बाबींचा तपास पोलीस करत आहेत.









