होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

भुसावळ हादरले: मंदिरातील पूजाऱ्याची निर्घृण हत्या; डोक्यात टणक वस्तूने वार

On: June 29, 2026 4:51 PM
Follow Us:
---Advertisement---

Bhusawal News: भुसावळ शहराजवळील झेडटीआरआय बोगद्याजवळील मंदिरातील ५५ वर्षीय पूजाऱ्याची डोक्यात टणक वस्तूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे शहरासह परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहेत.

अशी उघडकीस आली घटना

मिळालेली माहिती अशी की, मृत पूजाऱ्याचे नाव संतोष रघुवीर मंचल (वय ५५, रा. झेडटीआरआय परिसर, भुसावळ) असे आहे. शहरातील आरपीडी रस्त्यावरील लष्करी डेपोपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या तीन मंदिरांमध्ये ते पूजारी म्हणून कार्यरत होते. हा परिसर निर्जन असल्याने येथे नागरिकांची फारशी वर्दळ नसते. सोमवारी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या कुटुंबीयांनी मंदिरात जाऊन पाहिले असता संतोष मंचल यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला. त्यांनी तत्काळ शहर पोलिसांना माहिती दिली.

पोलीस घटनास्थळी

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले, शहर पोलीस निरीक्षक महेश गायकवाड, हवालदार संदीप पालवे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुरावे संकलित केले. तसेच जळगाव येथून ठसेतज्ज्ञ आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या पथकाला पाचारण करण्यात आले आहे.

हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट

संतोष मंचल यांची हत्या नेमकी कोणी आणि कोणत्या कारणातून केली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू असून परिसरातील माहिती, उपलब्ध पुरावे आणि संशयितांच्या हालचालींची पडताळणी केली जात आहे. या घटनेमुळे भुसावळ शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment