होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Jalgaon News: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; सख्ख्या मामाला 20 वर्षे सक्तमजुरी

On: July 1, 2026 7:17 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: जळगाव तालुक्यातील नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मनियारखेडा शिवारात चार वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी न्यायालयाने सख्ख्या मामाला 20 वर्षे सक्तमजुरी व 20 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच दंड न भरल्यास दोन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे. दंडाच्या रकमेतून 15 हजार रुपये पीडितेला देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.

 

या प्रकरणातील आरोपी परमनंद कन्हैयालाल गोरे (वय 26, रा. हुलई, ता. खालवा, जि. खंडवा, मध्य प्रदेश) याने 24 फेब्रुवारी 2022 रोजी पीडितेला खेळण्याच्या बहाण्याने घरी बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. घरी परतल्यानंतर पीडितेने आईला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांनी आरोपीला जाब विचारला असता तो फरार झाला. समाजात बदनामी होईल या भीतीने तक्रार दाखल करण्यास विलंब झाला. मात्र, नंतर नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या खटल्यादरम्यान सरकार पक्षाने 12 साक्षीदार तपासले. यात पीडितेची आई, पीडिता, वैद्यकीय अधिकारी, पंच तसेच तपास अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या.

सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील सुरेंद्र जी. काबरा यांनी प्रभावी युक्तिवाद केला. त्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती पी. पी. बनकर यांनी आरोपीला भारतीय न्याय संहिता कलम 376 तसेच पोक्सो कायद्याच्या कलम 6 व 5(एम) अंतर्गत दोषी ठरवत 20 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. या प्रकरणात पैरवी अधिकारी हेड कॉन्स्टेबल अमोल पाटील तसेच केस वॉच पोलीस निरीक्षक गुणवंत सोनवणे यांनी सहकार्य केले.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment