Latest Weather Update: राज्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस आहे, नाशिकमध्ये ही घाटमाथा भागात मुसळधार पाऊस सुरू आहे,त्यामुळे नाशिकला गोदावरीला पूर आला आहे. जळगावमध्ये सोमवारी काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मंगळवारी हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे. जळगाव, भडगाव, पारोळा, एरंडोल, अमळनेर आदी भागात हलक्या सरी पडल्या आहेत. धरण क्षेत्रात अद्याप ही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. तसेच जिल्हाभर मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम असून पावसामुळे पेरण्या काही ठिकाणी खोळंबल्या आहे. धुळे, नंदुरबारला हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. अद्याप काही ठिकाणी मुसळधार पावसाची शेतकरी वाट पाहत आहे. जळगाव शहरात सकाळी आणि दुपारी काही काळ उन पडले होते, वातावरणात काहीसा उकाडा देखील जाणवत होता. राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडत असताना जळगावमध्ये उकाड्याने हैराण केले, आज तापमान ३३.६ अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले आहे.
मुंबईत पावसाचा धिंगाणा
मुंबई (Mumbai)आणि उपनगरात पावसाने धिंगाणा घातला आहे.(Thane Mumbai Raigad ) ठाणे, मुंबई रायगड या जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस आणि काही तुरळक ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच, ताशी ७०-८० किमी वेगाने अधूनमधून जोरदार वारे वाहण्याची दाट शक्यता असल्याने आपत्ती व्यवस्थापन विभागाने गरज असेल तरच बाहेर पडण्याचा सूचना नागरिकांना दिल्या आहेत. अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने खाजगी आणि मनपा शाळांना आज सुट्टी दिली आहे. तसेच पालघर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.

नाशिकमध्ये ही घाट माथा भागात मुसळधार पाऊस सुरू आहे,त्यामुळे नाशिकला गोदावरीला पूर आला आहे. जळगावमध्ये सोमवारी काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मंगळवारी हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मात्र दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे, पावसामुळे पेरण्या काही ठिकाणी खोळंबल्या आहे. धुळे नंदुरबारला हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. अद्याप काही ठिकाणी मुसळधार पावसाची शेतकरी वाट पाहत आहे. पुण्यात काही ठिकाणी दरड कोसळली आहे.
मुंबई उपनगरांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई महानगराला मुसळधार पावसाचा तसेच सोसाट्याचे वारे वाहतील असा इशारा दिला आहे.या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील शासकीय, खासगी, महानगरपालिका शाळा व महाविद्यालयांना उद्या, दिनांक आज ६ जुलै २०२६ रोजी सुटी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, शासकीय व खासगी कार्यालये नियमितपणे सुरू राहणार आहे असे कळविले आहे. आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे देखील आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. पावसामुळे शहरातील वाहतूक आणि दैनंदिन कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन खासगी कंपन्यांनी शक्य असेल तेथे कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची (Work From Home) सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
उद्या ७ जुलैला रत्नागिरी आणि रायगडाला रेड अलर्ट
रत्नागिरी- रायगडला उद्या दि ७ जुलै रोजी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या ठिकाणी अति मुसळधार पावसाची शक्यता आहे तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याला येलो अलर्ट दिला आहे. तसेच उद्या पालघरला ऑरेंज अलर्ट दिला आहे, याठिकाणी मुसळधार किंवा अतिमुसळधार पाऊस बरसणार आहे. तसेच ठाणे, मुंबई सिंधुदुर्ग, नाशिक -पुणे-सातारा घाटमाथा भागासह १२ ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आला आहे.







