Aabacus Compitition: इंद्रायणी कोचिंग क्लासेस अँड जी चॅम्प अबॅकस यांच्यावतीने छत्रपती संभाजीनगर येथे विद्यार्थ्यासाठी राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धा घेण्यात आली. या राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत पंकज इंग्लिश मीडियम स्कूलच्या इयत्ता चौथीचा (इ.४ थी) विद्यार्थी यज्ञेश मंगल इंगळे याने ज्युनिअर लेव्हल अॅडव्हान्स गटात उत्कृष्ट कामगिरी करून ‘सुपरस्टार रँक’ प्राप्त केली. या स्पर्धेत राज्यभरातील मोठ्या संख्यने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत कठोर सराव, एकाग्रता याचा कस लागतो तसेच गणित विषयावर चांगली पकड असावी लागते. यज्ञेशच्या यशामुळे त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

मेहनत आणि शैक्षणिक कौशल्याच्या जोरावर यज्ञेशने हे यश खेचून आणले आहे. त्याच्या यशाने पालकांसह आपल्या शाळेचे, आणि मार्गदर्शक संस्थेचे नाव उज्ज्वल केले आहे. यज्ञेशच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. इंद्रायणी कोचिंग क्लासेस अँड जी चॅम्प अबॅकसच्या शिक्षकांनी त्याचे अभिनंदन करून भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या असून पुढील काळात अशाच यशाची अपेक्षा व्यक्त केली आहे. तसेच पंकज इंग्लिश मीडियम स्कूलचे शिक्षक, पालक आणि हितचिंतकांनीही यज्ञेशचे अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.










