होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Shukra Nakshatra Parivartan 2026 : शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनामुळे 16 जुलैपासून  ‘या’ 4 राशींचं नशीब पालटणार; सुरु होणार गोल्डन टाईम

On: July 8, 2026 2:49 PM
Follow Us:
---Advertisement---

Shukra Nakshatra Parivartan 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रात नवग्रहांना विशेष महत्त्व आहे. प्रत्येक ग्रहांच्या हालचलिंचा व्यक्तीच्या जीवनावर परिणाम होतो. अशात धन, वैभव आणि सुख-समृद्धीचा कारक मानला जाणारा शुक्र ग्रह येत्या 16 जुलै 2026 रोजी सिंह राशीत असून मघा नक्षत्रातून निघून पूर्वफाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. विशेष म्हणजे हे नक्षत्र शुक्राचेच आहे. त्यामुळे या नक्षत्र परिवर्तनामुळे शुक्र ग्रहाची शक्ती दुप्पट होईल. शुक्राचं आपल्याच नक्षत्रात येणं काही राशींसाठी भाग्याचं ठरणार असून त्यांचा गोल्डन टाईम सुरु होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी.

 

मेष रास

मेष राशी ही राशीचक्रातील पहिली रास आहे. शुक्राचं हे नक्षत्र परिवर्तन मेष राशीसाठी खूफ शुभ ठरणार आहे. या काळात तुम्हाला तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण करता येतील. तुमच्या कामाला गती मिळेल. तसेच, तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढेल. नोकरीत प्रमोशन मिळण्याची संधी आहे. तसेच, उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होतील.

 

सिंह रास

शुक्र ग्रह हा धन आणि वैभवाचा कारक ग्रह आहे. त्यामुळे शुक्राच्या या नक्षत्र परिवर्तनाने सिंह राशीच्या व्यक्तिमत्त्वात चांगले बदल दिसतील. समाज आणि कार्यक्षेत्रात तुमची लोकप्रियता वाढेल. तुमच्या भौतिक सुख समृद्धीत चांगली वाढ झालेली दिसेल. पार्टनरशिपमध्ये तुम्ही नवीन व्यवसायाची सुरुवात करु शकता. तुमच्यातील आत्मविश्वास वाढेल.

 

धनु रास

शुक्राचं नक्षत्र परिवर्तनामुळे तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. या काळात तुमच्या व्यवसायाचा विस्तार होईल. अनेक नवीन गोष्टी तुम्ही शिकाल. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. तसेच, या कालावधीत तुम्हाला एखादी शुभवार्ता ऐकायला मिळेल.

 

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांसाठी शुक्राचं नक्षत्र परिवर्तन लाभदायी ठरणार आहे. तुमच्या ओळखी तसेच, नवीन लोकांशी संपर्क वाढतील. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. करिअरची एक नवीन उंची गाठाल. वडिलोत्पार्जित संपत्तीचा तुम्ही लाभ घ्याल.

 

(डिस्क्लेमर : सदरचा लेख केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहे. शौर्य मराठी कोणताही दावा करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment