होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

शासकीय प्रशिक्षण संस्थेजवळील कचरा केंद्र तात्काळ हटवा; अन्यथा अर्धनग्न आंदोलन करू: रुग्णसेवक- श्रमिक संघटनेचा इशारा

On: July 9, 2026 2:15 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News:  महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेच्या वतीने जळगाव शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या भिंतीला लागून असलेला कचरा संकलन केंद्र तात्काळ हटवावा तसेच परिसरात फिरणाऱ्या भटक्या कुत्रांचा बंदोबस्त करण्याची मागणी जिल्हाध्यक्ष समाधान पवार यांच्या नेतृत्वात करण्यात आली. यावेळी महापौर दीपमाला काळे यांना निवेदन देण्यात आले. मागण्या न सोडविल्यास संघटनेने भरपावसात अर्धनग्न आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

निवेदनाचा आशय असा

जळगाव शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या भिंतीला लागून असलेला कचरा संकलन केंद्र लवकरात लवकर हटवण्यात यावे. सदर कचरा संकलन केंद्रामुळे संस्था परिसरात पावसाच्या पाण्यामुळे जास्त दुर्गंधी पसरत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच प्रशिक्षणार्थ्यांना जेवण करणे, प्रशिक्षण घेणे अडचणीचे होत असून, त्यांच्या प्रशिक्षणावर परिणाम होत आहे. तरी लवकरात लवकर कचरा संकलन करून १० दिवसात हटवण्यात यावे. कचरा संकलन केंद्र न हटवल्यास आम्ही भरपावसात अर्धनग्न उपोषण करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

वरील मागण्यांच्या माहितीची एक प्रत जळगाव जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, आमदार राजूमामा भोळे यांना ही देण्यात आल्याचे अध्यक्ष पवार यांनी कळविले आहे. याप्रसंगी कार्यकारणी पवन खंबायत, कल्पेश हीरोळकर, नंदकिशोर पाटील, चंद्रकांत पाटील आणि जळगाव जिल्हा अध्यक्ष समाधान पवार उपस्थित होते. मागण्या पूर्ण न केल्यास आंदोलनाचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment