होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

महाराष्ट्र हादरला: ९ वीच्या अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म; मोहनदरी आश्रमशाळेतील धक्कादायक घटना उघडकीस

On: July 10, 2026 7:36 PM
Follow Us:
---Advertisement---

Nashik News: नाशिक मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कळवण तालुक्यातील सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी असलेल्या मोहनदरी आश्रमशाळेत घडलेल्या एका घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. इयत्ता नववीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीने बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक व काळजाचा थरका उडविणारी घटना समोर आली असून, या प्रकारामुळे आदिवासी विकास विभागाच्या देखरेख व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

घटनेने महाराष्ट्र हादरला

या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित विद्यार्थिनीशी संबंध ठेवणारा आरोपी देखील अल्पवयीन व तिचाच नातेवाईक असल्याची माहिती समोर आली आहे. १९ जून रोजी हे घटना समोर आली. त्याला बाल न्याय व्यवस्थेनुसार बालसुधारगृहात पाठवण्यात आल्याची माहिती, आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त दिनकर पावरा यांनी दिली.

आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जातो. आश्रमशाळांमध्ये विद्यार्थिनींच्या आरोग्य तपासणीसाठी विविध सुविधा उपलब्ध असल्याचा दावा केला जातो. मात्र, मोहनदरी आश्रमशाळेतील या घटनेमुळे या यंत्रणेच्या अंमलबजावणीची पोलखोल झाली आहे. याप्रकरणामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. तसेच आश्रमशाळेतील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न आणखी गंभीर बनला आहे.

मुलींच्या सुरक्षितेचा प्रश्न गंभीर

विशेषतः विद्यार्थिनी गर्भवती राहिल्याची बाब इतक्या उशिरा लक्षात आली कशी? विद्यार्थिनींच्या आरोग्य तपासणीची प्रक्रिया नेमकी कशी राबवली जात होती? तसेच संबंधित जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी होणार का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
शासकीय आश्रम शाळेत दर महिन्याला विद्यार्थिनींची मासिक पाळी बाबत वैद्यकीय तपासणी होते, असे असताना देखील मोहनदरी आश्रम शाळेतील विद्यार्थिनी गर्भवती राहून थेट प्रसुत झाली. ही बाब आश्रम शाळेतील वसतीगृह अधीक्षक श्रीमती मिश्रा व मुख्याध्यापक अनिल अहिरे, वैद्यकीय अधिकारी यांच्या लक्षात कशी आली नाही विशेष आहे. या घटनेतील प्रसुत झालेली विद्यार्थिनी व संबंधित आरोपी हे दोघेही कळवण तालुक्यातील रहिवासी असल्याचे समजते.

आदिवासी विभागाकडून दखल

या प्रकरणात आश्रमशाळेतील संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि व्यवस्थापनाची सखोल चौकशी करण्याची मागणी विविध स्तरातून होत आहे. दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. दरम्यान, या गंभीर घटनेची दखल घेत आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त दिनकर पावरा यांनी खेद व्यक्त केला असून, प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याचे सांगितले आहे. चौकशीनंतर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

व्यवस्थेत त्रुटी?

एका निरागस अल्पवयीन विद्यार्थिनीच्या आयुष्यात घडलेल्या या घटनेने केवळ एक कुटुंब नव्हे, तर संपूर्ण समाजाला अंतर्मुख होण्यास भाग पाडले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी उभारलेल्या व्यवस्थेत कुठे त्रुटी राहिल्या, याचा शोध घेणे आणि भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करणे काळाची गरज ठरणार आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment