होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

सुवर्णपदक विजेता अडीच तास ताटकळत उभा होता, राज ठाकरे यांना नव्हती कल्पना, मग बोलावले कोणी?

On: August 7, 2026 12:46 PM
Follow Us:
---Advertisement---

Sports Person Dilip Gavit Issue: राष्ट्राकुल क्रीडा स्पर्धा 2026 या स्पर्धेतील सुवर्णपदक मिळवणारा खेळाडू दिलीप गावित (Dilip Gavit) हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thakeray) यांच्या भेटीसाठी गुरुवारी गेला होता. त्याच्यासोबत त्याचे प्रशिक्षक वैजनाथ काळे देखील होते. भेटीसाठी राज ठाकरे यांनी बोलावल्याचे सांगून त्यांनी अडीच तास ताटकळत वाट पहिली. या संतापजनक घटनेनंतर ते राज ठाकरे यांना न भेटताच माघारी परतले. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी तेथून जाणेच पसंत केले. यावर दिलीप आणि त्यांचे कोच वैजनाथ काळे त्यांनतर नाराजी दर्शविली. त्यांनी भेट ही ठरलेली असतानाही ही भेट झाली नाही, भेट द्याची नव्हती, तर बोलावले का असा सवाल उपस्थित करुन ते दोघही माघारी परतले.

दरम्यान राज ठाकरे यांनी या प्रकराची दखल घेत स्पष्ट केले की, ते येणार असल्याचे आपल्याला माहिती नव्हती, असती तर भेटलो असतो असे सांगितले. मग खेळाडू दिलीपला कोणी बोलावले असा प्रश्न समोर येतो. कोणी तरी बोलवले पण ठाकरे यांना माहिती नाही, असे काही आहे? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. पण देशासाठी पदक जिंकणाऱ्या खेळाडूचा सन्मान राखणे ही तितकेच महत्त्वाचे अशी चर्चा आहे. त्यासाठी ठाकरे यांनी दिलगिरी ही व्यक्त केली.

त्यांचाही गैरसमज झाला असावा

मनसे प्रमुख राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर होते, त्यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, “एका गोष्टीचा खुलासा करतो. काल आपले खेळाडू गावित येऊन गेले. तुमच्याकडे बातम्या पाहिल्या. एक तर त्यांना कोणी बोलावलं माहीत नाही. ते आले हे मला कोणी सांगितलं नाही. ते आले आणि मी भेटणार नाही, असं का करेन मी. त्यांचाही गैरसमज झाला असावा, ते दोन तास थांबले आणि मी भेटलो नाही. पण मला माहीतच नव्हतं ते आल्याचे, आता ते दिल्लीला गेले आहे, ते आल्यावर मी त्यांची भेट घेईन आणि त्यांच्याशी बोलेन. तुमचाही संपर्क झाला तर त्यांच्या कानावर या गोष्टी घाला.”

मी त्यांची भेट घेईन

आता या गोष्टी बाजूला ठेवा, पण ते आले आणि भेट झाली नाही या बाबत मी दिलगिरी व्यक्त करतो. ते दिल्लीला गेले. ते आल्यावर मी त्यांची भेट घेईन आणि त्यांच्याशी बोलेन. तुमचाही संपर्क झाला तर त्यांना सांगा.” खेळाडू दिलीप गावित यांनी 2026 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 100 मीटर टी47 प्रकारात 10.71 सेकंदांचा क्रीडा विक्रम प्रस्थापित करून सुवर्णपदक जिंकले. पेठ सुरगाणा आदिवासी बहुल भागातून येणाऱ्या कविता राऊत या धावपटूनंतर दिलीपने सुवर्णपदक जिंकत महाराष्ट्रासाठी अभिमानस्पद कामगिरी केले आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

एसटीचा उत्पन्न वाढीवर भर: लालपरी आता विनावाहक धावणार: मंत्री प्रताप सरनाईक

‘बीड–पुणे’ १७ सप्टेंबरला तर ‘बीड–मुंबई’ रेल्वे सेवा डिसेंबर अखेर सुरू होणार; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतला आढावा

राज्य मंत्रीमंडळाने घेतले ‘हे’ 4 धडाकेबाज मोठे निर्णय; नशामुक्त महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल

बटाटा चिप्स, नूडल्स, सूपच्या मुदतबाह्य पाकिटावर नवीन तारखा लावणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; एफडीएच्या कारवाईने खळबळ

पथनाट्याच्या माध्यमातून तरुणाईने टाकला ‘डेअरी’ उद्योगातील वास्तवावर प्रकाश

संघर्ष, साधना म्हणजे आशाताई: घोषाल..पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते श्रेया घोषाल यांना आशा भोसले पुरस्कार प्रदान

Leave a Comment