Chopda News: चोपडा शहर पोलिसांनी जुना शिरपूर रोड हरेश्वर मंदिराच्या पुढे पुलावर टायर फुटून उभ्या असलेल्या महिंद्रा पीक अप गाडीमध्ये कत्तलीच्या उद्देशाने भरलेली बैल जातीचे गुरे पकडून नऊ गुरांची सुटका करून गोशाळेत रवाना केले आहेत. जवळपास १४ लाख ५३ हजारांच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अज्ञात वाहन चालका विरूद्ध पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. बहुतेक गाडीचे टायर फुटल्याने चालकाने धूम ठोकली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या दोन्ही कारवाईत १३ गुरांची सुटका करण्यात आली आहे.
अशी झाली कारवाई
याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी की, दिनांक ९ ऑगस्ट रोजी १ वाजून ३० मिनिटांनी जुना शिरपूर रोड हरेश्वर मंदिराच्या पुढे पुलाजवळ विना क्रमांकाची दहा लाख रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची महेंद्र पिकअप चार चाकी गाडीचे मागील दोघे टायर फुटलेल्या अवस्थेत उभी असून गुरांनी खचाखच भरलेली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यावरून चौकशी अंती त्यात जवळपास ९ बैल जातीचे गुरे वेदना होतील अशा क्रूर रीतीने जखडून बांधून कमी उंचीच्या वाहनात कोंबून कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले. मागील दोन्ही टायर फुटलाने चालकाने पलायन करून गाडी तिथे सोडून दिलेली असल्याचे उघड झाले. त्या गाडीतील एकूण चार लाख तीस हजार रुपये किंमतीचे गुरे व दहा लाख रुपये किंमतीची गाडी पोलिसांनी जप्त केली आहे.

गुरांना गोशाळेत दाखल केले
पोकॉ महेंद्र युवराज पाटील यांच्या तक्रारीवरून अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर ३३१ /२०२६ प्राण्यांना क्रुरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिक कलम ११ (१)(घ ),(ड), (च )सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चे सन २०१५ पर्यंत सुधारणेसह कलम ५ (अ) व ५(ब),९ प्रमाणे पुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ संतोष पारधी हे तपास करीत आहे.
दुसऱ्या कारवाईत तिघांवर गुन्हा
दरम्यान वैजापूर गावाकडून व बोरअजंटीची मार्गे आडगावच्या पुढे बोरअजंटी रोडवर चार गुरे कत्तलीच्या इराद्याने नेत असताना आरोपी उत्तम शेकड्या पावरा(रा.खाऱ्यापाडाव), रफिक शेख (पूर्ण नाव माहित नाही), वसीम कुरेशी (रा.केजीएन कॉलनी चोपडा) अशा तिघांवर ) एक लाख रुपये किंमतीचे जनावरे कत्तलीच्या उद्देशाने पायी हाकीत नेत असतांना आढळून आले. त्यांच्यावर पो.कॉ शांताराम धनगर यांच्या तक्रारीवरून गुरनं 330/ 2026 प्राण्यांना क्रुरतेने वागणूक कलम 11( 1)D महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम 1995 चे कलम 5 (अ )प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोकॉ.रजनीकांत भास्कर हे करित आहे








