होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

“तिने मला प्रेमात फसवले, हवी तेवढी कॅश काढून घेतली,” अशा आशयाची चिट्ठी लिहून तरुणाची आत्महत्या! नेमकी घटना काय ‘ते’ जाणून घ्या

On: August 21, 2026 5:10 PM
Follow Us:
---Advertisement---

Nashik News: नाशिकच्या गंगापूर रोडवरील ध्रुवनगरमध्ये २६ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव वरुण भाऊसाहेब भामरे आहे. “तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन् मला धमकावून तू मर..” असं सांगून रस्त्यात अडवून मारहाण केल्याचा आरोप ‘सुसाईड नोट’मध्ये करून वरुण भामरे याने गुरुवारी सायंकाळी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. त्याने संबंधितांचे नावे चिठ्ठीत लिहून न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचं सांगून प्रतिक्षा करावी लागली तरी चालेल, पण यांना शिक्षा करा…’ अशी थेट पोलीस आयुक्तांकडे मागणी केली आहे.

आपल्या राहत्या घरातच वरुणने जीवन संपवले. वरूणला बेशुद्धावस्थेत त्याचा मावसभाऊ तेजस पवार याने शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्याने तपासून वरुणला मृत घोषित केले. त्याच्या पश्चात आई, वडील, आजी, दोन बहिणी, काका असा परिवार आहे. त्याच्या मृत्यूने गंगापूर रोड ध्रुवनगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात अकस्मात नोंद करण्यात आली असून पोलिसांनी वरुणने मृत्यूपूर्व लिहिलेली सुसाईड नोट ताब्यात घेतली आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गंगापुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

नेमके चिट्ठीत काय लिहिले?

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर, माझ्या मरण्यामागे हे तिघे आणि तिचे भाऊ आहे. काल त्यांनी मला रस्त्यात अडवून मारलं आणि धमकी दिली, की तू मर नाही तर…’ त्यांना माझे घेतलेले कॅश द्यायचे नाही. वन टाइम, त्यामुळे माझ्यावर काहीही आरोप लावला आहे. तिने मला प्रेमात फसवले व माझ्याकडून हवे तेवढे कॅश काढून घेतले. मी माझे कॅश वन टाइम मागितले तर तुझी वाट लावू अशी धमकी देतात. संदीप कर्णिक सर माझी तुम्हाला विनंती आहे, मोठे माणसे पैशांच्या जीवावर काहीही करु शकता, पण मला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. प्रतिक्षा करावी लागली तरी चालेल पण यांना शिक्षा करा, असंही वरूणने म्हटलं आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment