होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

मोठी बातमी: इन्फोसिस पब्लिक सर्व्हिसेसचे सीईओ लक्ष गोपीसेट्टी नेपाळमधील पुरात बेपत्ता; कंपनीने निवेदन केले जारी

On: August 29, 2026 5:58 PM
Follow Us:
---Advertisement---

Nepal Flood: नेपाळमधील पुराच्या संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. इन्फोसिस पब्लिक सर्व्हिसेसचे (CEO) मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष गोपीसेट्टी नेपाळमधील पुरात बेपत्ता झाले आहेत. कंपनीने सांगितले की, गोपीशेट्टी हे वैयक्तिक दौऱ्यावर नेपाळला गेले होते. सध्या त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.

नेपाळमधील पुरात आतापर्यंत ६०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, २,००० हून अधिक लोक अजूनही बेपत्ता आहेत. या लोकांमध्ये आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसच्या पब्लिक सर्व्हिसेसचे सीईओ लक्ष गोपीसेट्टी यांचाही समावेश आहे. ते वैयक्तिक दौऱ्यावर नेपाळला गेले होते, असे सांगून कंपनीने त्यांच्या बेपत्ता होण्याची घोषणा केली. पूर ओसरल्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू होते, परंतु अद्याप कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही.

शुक्रवारी कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नेपाळ दौऱ्यावर असलेले लक्ष गोपीसेट्टी हे बेपत्ता आहेत. त्यांच्याबद्दल माहिती गोळा करण्यासाठी कंपनी सध्या विविध संस्थांसोबत काम करत आहे. कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, “आम्ही याची पुष्टी करतो की, आमचे सहकारी, लक्ष गोपीसेट्टी, सध्या संपर्कात नाहीत. त्यांच्याबद्दल माहिती गोळा करण्यासाठी आम्ही संबंधित सरकारी अधिकारी आणि संस्थांसोबत काम करत आहोत. कंपनी त्यांच्या कुटुंबीयांच्याही सतत संपर्कात आहे.”

कंपनीच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, गोपीसेट्टी यांचे काम प्रामुख्याने अमेरिका आणि कॅनडातील सार्वजनिक क्षेत्रावर केंद्रित आहे. ते सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांना त्यांच्या कार्यांना पाठिंबा देण्यासाठीच्या धोरणांवर सल्ला देतात. ते अनेक वर्षांपासून इन्फोसिसशी संबंधित आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

पूराचा तडाखा: उत्तराखंडमध्ये पावसाचा धुमाकूळ, हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

कांद्याचे दर वाढले; ‘कांदा एक्सप्रेस’ अन् रस्ते वाहतुकीद्वारे देशभरात कांद्याचे वितरण

भारत-उझबेकिस्तान हे व्यापक सामरिक भागीदार: पंतप्रधान नरेंद्र मोदी, उझबेकिस्तानचा सर्वोच्च पुरस्कार मोदी यांना प्रधान

नेपाळमध्ये पुराचे तांडव: आतापर्यंत ७३४ जणांचा मृत्यू; राज्यातील ४०४ नागरिक सुरक्षित, ३३८ जण शासकीय यंत्रणांच्या संपर्कात

नेपाळ विनाशकारी पूर अन् भूस्खलन: मृतांची संख्या ६२६ वर पोहोचली

नेपाळ विनाशकारी पूर: मृतांची संख्या ४६९ वर; लोकांना वाचवण्याच्या बचावकार्यला गती; ३७ भारतीय काठमांडूकडे रवाना

Leave a Comment