Mumbai News: गेल्या पाच दिवसांपासून सोने दरात घसरण सुरू होती. सणासुदीच्या काळात सोन्यातील घसरण ग्राहकांच्या पथ्यावर पडली होती. मात्र, ग्राहकांना दिलासा देणारी घसरण थांबली असून सोने खरेदी करतांना ग्राहकांच्या खिशावर भार पडणार आहे. आज सोन्याच्या दरानं ग्राहकांना मोठा झटका दिला आहे, सोन्या- चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याचं चित्र बघायला मिळाले. सोन्या-चांदीच्या दरात नेमकी किती वाढ झाली आहे हे पाहू या.
दरम्यान गुरुवारी सोन्याचे दर वायदे (MCX) बाजारात १. ५ लाख रु. इतका होता. त्यात आज वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आज १.५५ लाख रु. इतका वाढलं आहे. एमसीएक्सवर देखील ५ हजारांची वाढ आहे. दरम्यान आज ४ सप्टेंबर रोजी, सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ दिसून आली आहे. सलग सहा दिवसांपासून सुरू असलेली सोन्याच्या दरातील घसरणीला ब्रेक लागला आहे. राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात ९९.९ टक्के शुद्धतेच्या सोन्याचा दर ३४०० रुपयांनी वाढून प्रति १० ग्रॅम १,५९,५०० रुपयांवर गेला आहे. तसेच चांदीचा भावही ५ हजार रुपयांनी वाढून चांदी प्रति किलोग्राम २,४०,५०० रुपयांवर गेली आहे. त्यामुळे ग्राहकांना आज खरेदीसाठी खिशाला कात्री लागली आहे.
चांदी महागली
दरम्यान चांदीच्या दरातही मोठी वाढ दिसून येत आहे. चांदीचा भाव ५००० ने वाढून २,४०,५०० रु. प्रति किलोग्राम झाला. यापूर्वी, गुरुवारी चांदीचा भाव २,३५,५०० रु. प्रति किलोग्रामवर बंद झाला होता. अलीकडील उच्चांकावरून यूएस बाँड यील्ड्स घसरल्याने सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा वाढ दिसून आली आहे. शिवाय, नव्याने निर्माण झालेल्या भू-राजकीय तणावामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पुन्हा मौल्यवान धातूंची मागणी वाढली आहे. दरम्यान, सध्या सणासुदीचा काळ सुरु असून या काळात ग्राहक मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीची खरेदी करतात. मात्र, आता सोन्या चांदीच्या दरात वाढ झाल्यानं ग्राहकांच्या खिशावर ताण पडणार आहे.

सोने चांदीच्या दरातील हा महत्त्वपूर्ण बदल हा सर्वसामान्यांसाठी फायदेशीर होता. सध्या सणासुदीचा काळ आहे .या काळात मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीची खरेदी केली जाते. त्यामुळं काल दरात घसरण झाल्याचा फायदा ग्राहकांनी उठवला होता. ही खरेदी करण्याची सुवर्ण संधी होती. आज दरात वाढ झाल्यानं ग्राहकांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.
अमेरिकेचे चलनविषयक धोरण
विश्लेषकांनी दिलेल्या माहितीनुसार, सोन्याच्या किंमतीतील ही सुधारणा अमेरिकेच्या चलनविषयक धोरणाबाबतच्या बाजारातील अपेक्षांमधील बदलांप्रति असलेली त्याची संवेदनशीलता दर्शवते. व्याजदर आणि अमेरिकन बाँड यील्ड्समधील बदलांचा सोन्याच्या किमतींवर अनेकदा परिणाम होतो.











