होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

तामिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांचे फेक अकाउंट, नशिराबादमधून चेन्नई पोलिसांनी घेतले एकास ताब्यात

On: September 8, 2026 7:49 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या नावाने सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार केलेले व्हिडिओ, डिजिटल छायाचित्रे तसेच विविध पोस्ट प्रसारित केल्याच्या कथित प्रकरणाचा तपास मंगळवारी नशिराबादपर्यंत येऊन पोहचला. या प्रकरणाच्या तपासासाठी चेन्नई पश्चिम विभाग सायबर गुन्हे पोलिसांच्या पथकाने नशिराबाद येथील होमगार्ड मोहम्मद जुनेद शेख कुतुबुद्दीन याला चौकशीसाठी ताब्यातही घेतले. त्यानंतर त्याला जळगाव न्यायालयात हजर करून पुढील तपासासाठी ताबा मिळविण्याची कायदेशीर प्रक्रिया करण्यात आली.

मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या नावाने किंवा त्यांच्या ओळखीचा आभास निर्माण करणारे सोशल मीडिया अकाउंट तयार करण्यात आल्याचा चेन्नई सायबर पोलिसांना संशय आहे. संबंधित अकाउंटवरून एआय जनरेटेड व्हिडिओ, डिजिटल छायाचित्रे आणि विविध पोस्ट प्रसारित करण्यात आल्याचे तपासात समोर आल्याचे सांगण्यात येते. या डिजिटल सामग्रीची निर्मिती, अकाउंटचे संचालन आणि त्याचा प्रसार नेमका कोणी केला? याचा शोध सायबर पोलिसांकडून घेतला जात आहे. याप्रकरणी तमिळनाडूमध्ये गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

डिजिटल पुराव्यांची तपासणी

तपासाचा एक भाग म्हणून संबंधित सोशल मीडिया अकाउंट्सचे आयपी लॉग, लिंक्ड अकाउंट्स, ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक, सबस्क्रायबर तपशील तसेच वापरण्यात आलेल्या डिजिटल उपकरणांची माहिती तामिळनाडू पोलिसांकडून तपासली जात आहे. अकाउंट कोणत्या ठिकाणाहून आणि कोणत्या उपकरणाद्वारे हाताळण्यात आले, तसेच त्यावरून किती डिजिटल सामग्री प्रसारित करण्यात आली, याचाही तपास केला जात आहे. या तांत्रिक तपासातून महत्त्वाचे डिजिटल पुरावे हाती लागण्याची शक्यता आहे.

होमगार्डच्या भूमिकेबाबत चौकशी

नशिराबाद येथील होमगार्ड मोहम्मद जुनेद शेख याचा या प्रकरणात नेमका सहभाग काय आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याने संबंधित अकाउंट तयार केले होते का, त्याचे संचालन केले होते का किंवा डिजिटल सामग्रीच्या प्रसारणाशी त्याचा संबंध होता का, याबाबत सायबर पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. तपासातून मिळणारे डिजिटल पुरावे आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

Ganesh Festival: गणेश विसर्जन मार्गाची प्रशासनाकडून पाहणी; मार्गातील अडथळे दूर करण्याचे निर्देश

जळगाव जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटनेतर्फे मंत्री गिरीश महाजन यांना निवेदन; समान काम, समान वेतनासाठी मुंबईत जोरदार पाठपुरावा

चोपडा तालुक्यातील 79 ग्रा.पं.चे आरक्षण जाहीर; सरपंचपदासाठी इच्छुकांच्या हालचाली गतिमान

कंडारी गावाजवळ मुख्य जलवाहिनीला गळती, शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत, आजचा पाणीपुरवठा उद्या 8 सप्टेंबरला होणार! एक दिवस उशिराने पुरवठा नियोजन

..अखेर आयआयटी बॉम्बेच्या तज्ज्ञांकडून नाशिकच्या रस्त्यांची पाहणी; कोअर कटद्वारे काँक्रिटची तपासणी

Latest Weather News: पुढील ‘हे’ तीन दिवस जळगावचे हवामान राहणार कोरडे; मध्य महाराष्टात कशी असेल स्थिती ‘ते’ जाणून घ्या!

Leave a Comment