होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

तणाव वाढला: अमेरिकेचा इराणच्या ५ तेल टँकर्सवर हल्ला; इराणने जॉर्डनमधील अमेरिकन तळ अन् युद्धनौकांना केले लक्ष्य

On: September 9, 2026 12:36 PM
Follow Us:
---Advertisement---

Iran US Conflict: दोन दिवसांत अमेरिकेच्या युद्धनौकेवर दोनदा बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागल्याचा आरोप केल्यानंतर, अमेरिकेने ओमानच्या आखातात आणि खार्ग बेटाजवळ इराणच्या पाच तेलवाहू जहाजांवर (टँकर्सवर) हल्ले केले. ‘एम-टी काविझ’, ‘एम-टी चारमिनार’, ‘एम-टी होरायझन १’, आणि ‘एम-टी रिस्को’ तसेच खार्ग बेटाजवळील ‘एम-टी डेर्या’ या पाच टँकर्सचा समावेश आहे. दरम्यान इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी इराणच्या व्यापारी जहाजांवर अमेरिकेने केलेल्या ताज्या हल्ल्यांचा निषेध केला. या कृतीला संयुक्त राष्ट्रांच्या सनदेचे उल्लंघन आणि “युद्धगुन्हा” असल्याचे इराणने म्हटले आहे. मात्र, या संघर्षामुळे बुधवारी सुरुवातीच्या व्यवहारांमध्ये तेलाच्या किमती प्रति बॅरल ९९.४९ डॉलर्सवर पोहोचल्या.

इराणचे प्रतित्युत्तर

मंगळवारच्या या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणने जॉर्डनमधील ‘अल अझराक’ तळावर तैनात असलेल्या अमेरिकन सैन्यावर क्षेपणास्त्रे डागली. तसेच, या भागात अमेरिकेची किमान दोन जहाजे आणि आठ टँकर्सवर आणखी हल्ले केल्याचा दावाही इराणने केला आणि या हल्ल्यांमुळे “मोठे नुकसान” झाल्याचे म्हटले. असे वृत्त अल जंजिराने दिले आहे.

अमेरिका आणि इस्रायलचे इराणविरुद्धचे युद्ध सुरू होऊन सहा महिने झाले आहेत आणि या काळात आखाती प्रदेशात तणाव वाढला आहे. इराणने ‘होरमुझची सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz) बंद केली आहे, तर वॉशिंग्टनने इराणच्या बंदरांवर नौदल नाकेबंदी लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंनी ही कारवाई झाली.

मंगळवारी उशिरा जारी केलेल्या निवेदनात, अमेरिकेच्या ‘सेंट्रल कमांड’ने (CENTCOM) सांगितले की, इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ने (IRGC) गेल्या दोन दिवसांत अमेरिकेच्या युद्धनौकेला दोनदा लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्या जहाजाने “इराणचे हल्ल्याचे प्रयत्न यशस्वीपणे परतवून लावले”.

कोणत्याही अमेरिकन कर्मचाऱ्याला दुखापत नाही

सेंट्रल कमांडने सांगितले की, याला प्रत्युत्तर म्हणून त्यांनी ओमानच्या आखातातील ‘एम-टी काविझ’, ‘एम-टी चारमिनार’, ‘एम-टी होरायझन १’, आणि ‘एम-टी रिस्को’ तसेच खार्ग बेटाजवळील ‘एम-टी डेर्या’ या इराणच्या तेलवाहू जहाजांवर हल्ले करून ती नष्ट केली.”जहाजांवर हल्ला करून ती निकामी करण्यापूर्वी अमेरिकन सैन्याने त्यावरील कर्मचाऱ्यांना जहाजे सोडून बाहेर पडण्याचे आदेश दिले होते,” असेही सेंट्रल कमांडने नमूद केले. त्यानंतर त्यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला, ज्यामध्ये ‘एम-टी रिस्को’ हे जहाज ओमानच्या आखातात बुडताना दिसत असल्याचा दावा करण्यात आला.

इराणकडून ताज्या हल्ल्याचा निषेध

इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी इराणच्या व्यापारी जहाजांवर अमेरिकेने केलेल्या ताज्या हल्ल्यांचा निषेध केला. या कृतीला संयुक्त राष्ट्रांच्या सनदेचे उल्लंघन आणि “युद्धगुन्हा” असे संबोधले. त्यात म्हटले आहे की, या “बेकायदेशीर आणि आक्रमक कारवाया” म्हणजे अमेरिकेकडून त्या देशाविरुद्ध सुरू असलेल्या लष्करी “आक्रमकता” आणि “आर्थिक युद्धा”चाच एक भाग आहेत. तसेच, या कृतींच्या परिणामांची संपूर्ण जबाबदारी वॉशिंग्टन आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर असेल, असा इशाराही देण्यात आला आहे.

अमेरिकेकडून हल्ल्याचे समर्थन

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी या हल्ल्यांचे समर्थन केले. कोलंबियाच्या दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, वॉशिंग्टन माघार घेणार नाही. ते म्हणाले, “इराण अमेरिकेच्या नौदलाच्या जहाजांवर हल्ले करण्याचा प्रयत्न करत आहे; आणि जेव्हा जेव्हा ते असे करतील किंवा तसा प्रयत्न करतील, तेव्हा त्यांना त्यांचे टँकर्स गमवावे लागतील.”

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

सागरी सुरक्षेवर भर: युद्धात ‘AI’ प्रणालींचा वापर वाढवणार- नौदल उपप्रमुखांची माहिती

‘एल निनो’च्या प्रभावाने हवामानात बदल; फेब्रुवारी महिन्यांपासूनच उष्णता जाणवणार!

मृत्यूचं तांडव: कोलकाता चँगराचेंगरीतील १९ मृत्यूंपैकी १८ जण स्थानिक तर एक बिहारी- मुख्यमंत्र्यांची माहिती; पंतप्रधान मोदी यांनी केले तीव्र दुःख व्यक्त

भारतावर १०० टक्के टेरिफ लागणार की नाही? ट्रम्प १० दिवसात ठरवणार- अमेरिकन राजदूत सर्जिओ गोर

रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट; ७८ दिवसांचा बोनस जाहीर

सावधान! सायबर गुन्हेगार करताहेत वृद्धांना टार्गेट; एका निवृत्त शास्त्रज्ञाला ‘डिजिटल अरेस्ट’ करून १.२५ कोटींची फसवणूक; अखेर ११ जण गजाआड

Leave a Comment