होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

धुळ्यात सुमारे ४४ हजारांवर अनधिकृत नळ जोडण्या; मनपाकडून गुन्हा दाखल करण्याचा इशारा

On: September 17, 2026 4:00 PM
Follow Us:
---Advertisement---

Dhule News: धुळे महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत नळ जोडण्यांना आळा घालण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने धडक मोहीम हाती घेतली असून, आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली आजपासून अनधिकृत नळ जोडण्यांचे घरनिहाय सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. अनधिकृत नळ कनेक्शन धारकांवर कारवाईचा इशारा मनपा प्रशासनाने दिला आहे.

महानगरपालिकेच्या उपलब्ध अभिलेखांची तसेच मालमत्ता कर विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, ज्या मालमत्ताधारकांच्या नळ जोडणीबाबत मनपाच्या अभिलेखांमध्ये कोणतीही नोंद उपलब्ध नाही, अशा मालमत्तांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी व शहानिशा करण्यात येणार आहे. उपलब्ध अभिलेखांच्या प्राथमिक तपासणीत सुमारे ४४ हजार ४७४ नळ जोडण्या अनधिकृत असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. प्रत्यक्ष सर्वेक्षणानंतरच याबाबतची अंतिम स्थिती स्पष्ट होणार आहे.

५७ कर्मचाऱ्यांची नियुक्ती

या सर्वेक्षणासाठी पाणीपुरवठा विभागातील ५७ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्यामार्फत घरनिहाय पडताळणी करून आवश्यकतेनुसार पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्वेक्षणाच्या कामावर नियंत्रण व देखरेख ठेवण्यासाठी ८ पडताळणी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पाणीपट्टी वसूल करणार

सर्वेक्षणादरम्यान एखाद्या मालमत्तेवर अनधिकृत नळ जोडणी आढळून आल्यास संबंधित मालमत्ताधारकाकडून आजतागायत निघत असलेली पाणीपट्टी वसूल करण्यात येणार आहे. तसेच अनधिकृत नळ जोडणी अथवा पाणी चोरीचे प्रकरण आढळल्यास, नियमानुसार गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्याचे आदेशही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

नागरिकांनी अधिकृत नळ जोडणी घ्यावी

ज्या नागरिकांनी अनधिकृत नळ जोडणी घेतलेली आहे, त्यांनी कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी तात्काळ आपल्या प्रभागातील संबंधित क्षेत्रीय कार्यालयात नळ जोडणीसाठी अर्ज सादर करावा आणि आपल्या नळ जोडणीची अधिकृत नोंद करून घ्यावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.

शहरातील पाण्याचा संभाव्य गैरवापर रोखणे, पाणी चोरीला आळा घालणे तसेच पाणीपुरवठा व्यवस्थेत पारदर्शकता आणणे या उद्देशाने हे सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. सर्वेक्षणासाठी येणाऱ्या मनपा कर्मचाऱ्यांना नागरिकांनी आवश्यक सहकार्य करावे आणि अनधिकृत जोडणीमुळे होणारी पुढील कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी आपली नळ जोडणी अधिकृत करून घ्यावी, असे आवाहन धुळे महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment