होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Pitru Paksha 2026 : पितृपक्षात कावळ्यांना अन्न का देतात? जाणून घ्या कावळ्याचा आणि पितरांचा नेमका काय संबंध?

On: September 26, 2026 3:53 PM
Follow Us:
---Advertisement---

Pitru Paksha 2026 : गणेशोत्सवाची सांगता होत आजपासून पितृपक्षाला सुरुवात झाली आहे. पंचांगानुसार, यंदा 27 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर 2026 दरम्यान पितृपक्ष पंधरवडा सुरु असणार आहे. हिंदू धर्मात पितृपक्षाला विशेष महत्त्व आहे. हा कालावधी पितरांना म्हणजेच पुर्वजांना समर्पित आहे. मान्यतेनुसार, कालावधीत पूर्वज आपल्या वंशजांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीतलावर येतात. त्यानुसार, वंशज आपल्या पूर्वजांची म्हणजेच पितरांची पूजा करत पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी श्राद्ध, तर्पण विधी करतात. या विधीचे अन्न कावळ्याला खाऊ घालण्याची परंपरा आहे. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का, पितृपक्षात इतर पशू-पक्षांना नव्हे तर कावळ्यालाच अन्न का दिलं जातं? कावळ्याचा आणि पितरांचा नेमका संबंध काय? हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

पितृपक्ष म्हणजे काय?

धार्मिक मान्यतेनुसार, भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्ष तिथीला येणारा विधी म्हणजेच पितृपक्ष. त्यानुसार, यंदा 27 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर 2026 हा पितृपक्षाचा कालावधी आहे. पितृपक्षाचा कालावधी पंधरा दिवसांचा असतो. म्हणून त्याला पितृपक्ष पंधरवडा असं म्हणतात. या कालावधीत पूर्वज आपल्या घरी येतात आणि आशीर्वाद देतात अशी मान्यता आहे. पितृपक्षात पूर्वजांचे स्मरण करुन कावळ्यांना भोजन देतात.

पितृपक्षात का देतात कावळ्यांना भोजन?

मान्यतेनुसार, कावळ्यांना भोजन दिल्याने श्राद्धविधी पूर्ण होतो आणि पितरांच्या आत्म्याला शांती मिळते. याच कारणामुळे पितृपक्ष पंधरवड्यात कावळ्यांना भोजन देण्याची परंपरा आहे. त्यामागे एक पौराणिक कथा देखील आहे. त्यानुसार, इंद्राचा मुलगा जयंत हा कावळ्याचे रुप धारण करणारा पहिलाच होता. जेव्हा भगवान श्री राम पृथ्वीवर अवतरले त्यावेळी जयंतने कावळ्याचे रुप धारण करुन देवी सीतेच्या पायाला चोच मारली. तेव्हा भगवान श्रीरामांनी जयंतच्या डोळ्यांवर बाण मारला. जेव्हा त्याने आपल्या कृत्याबद्दल क्षमा मागितली तेव्हा रामाने त्याला वरदान दिलं की, पितृपक्षात तुला दिलेलं अन्न पितृ लोकांत राहणाऱ्या पूर्वज देवांना मिळेल असे आशीर्वाद दिले. तेव्हापासून पितृपक्षात कावळ्याना भोजन देण्याची परंपरा शतकानुशतकं सुरु आहे, अशी आख्यायिका सांगितली जाते. मान्यतेतुसार, ठेवलेला नैवेद्यास कावळ्याने स्पर्श केल्यास देव यमराजही प्रसन्न होतात अशीही मान्यता आहे.

(डिस्क्लेमर : सदरचा लेख केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहे. शौर्य मराठी कोणताही दावा करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment