होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

उद्या ७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा येलो अलर्ट; जळगावसह राज्यात पुढील ४ दिवस हवामान ‘असे’ राहील!

On: September 27, 2026 12:43 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर या जिल्ह्यात हलका आणि मध्यम पावसाचा इशारा आहे. काही ठिकाणी हवामान कोरडे आहे. जळगावला आज २७ व उद्या २८ सप्टेंबरला हवामान कोरडे राहणार असून पुढील तीन दिवस हलक्या सरी बरसतील. वातावरणात कमालीचा उकाडा जाणवत आहे. जळगावचे कमाल तापमान ३५ अंश सेल्सियसवर पोहचले आहे. कोल्हापूर घाट परिसराला उद्या २८ सप्टेंबर तर,२९ सप्टेंबर रोजी नाशिक कोल्हापूर, पुणे, सातारा या घाटमाथा भागाला मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे. पुणे, कोल्हापूर,सातारा घाट परिसर तसेच सातारा कोल्हापूर,सांगली, बीड, धाराशिव, घाटमाथ्यासह या ७ जिल्ह्यात मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.

नैऋत्य मोसमी वारे कमकुवत

प्रादेशिक हवामान केंद्राच्या मते संपूर्ण राज्यात नैऋत्य मोसमी वारे कमकुवत राहिले आहेत. कोकण-गोवा आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडला असला तरी, राज्यातील उर्वरित भागात हवामान कोरडे राहिले. त्यामुळे काही भागात भीषण दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. त्याचा लाभ २६५ तालुक्यांना मिळणार आहे. मात्र परतीच्या पावसाकडे शेतकऱ्यांच्या नजरा आहे.

या भागात सोसाट्याचा वारा वाहणार

कोकणातील रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे ३१ किमी प्रति तास, रायगडमध्ये ३० किमी प्रति तास वेगाने वारे वाहील. तर, मध्य महाराष्ट्रात धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे ४८ किमी प्रति तास, पुणे येथील बारामतीत ४६ किमी प्रति तास मराठवाडयातील बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे ५० किमी प्रति तास, लातूर येथील चाकूर ४८ किमी प्रति तास वेगाने वारे वाहणार असल्याचा अंदाज आहे.

विदर्भ वगळून शेतकऱ्यांसाठी प्रादेशिक हवामान अंदाज

मुंबई कोलाबा हवामान विभागाने शेतकऱ्यांसाठी पुढील चार दिवसांचा अंदाज दिला. राज्यात विदर्भ वगळता कोणत्या भागात पाऊस पडेल अथवा हवामान कोरडे राहील याची माहिती जाणून घ्या

२८ सप्टेंबर रोजी- दक्षिण कोकण-गोवा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र या विभागांमधील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी, तसेच उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्र या विभागांमधील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मराठवाडा विभागातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

२९ सप्टेंबर- दक्षिण मध्य महाराष्ट्र विभागातील जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी, कोकण-गोवा विभागातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी आणि उत्तर मध्य महाराष्ट्र व मराठवाडा विभागांमधील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

३० सप्टेंबर- दक्षिण कोकण-गोवा विभागातील जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी, दक्षिण मध्य महाराष्ट्र विभागातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी, तसेच उत्तर कोकण आणि मराठवाडा विभागांमधील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
उत्तर मध्य महाराष्ट्र विभागातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

०१ ऑक्टोबर- कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या विभागांमधील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

दुसऱ्या हल्लेखोराची बंदूक जाम झाली अन् वाचले टायगर श्रॉफचे प्राण? राजस्थान येथून तिघा संशयितांना अटक

मित्राला ‘फॉरएव्हर बाय’ म्हणून तरुणीची आत्महत्या? कुटुंबाने घाईत उरकले अंत्यसंस्कार, पोलिसांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली!

Ketan Agarwal Death Case : लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरण! अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती

छत्रपती संभाजीनगर येथे रामदास आठवले यांचा दुष्काळी पाहणी दौरा; शेतकऱ्याने मांडल्या व्यथा

मोठी बातमी: शासनाच्या ऑनलाइन सेवा ४ दिवस बंद; आज ४ वाजेपर्यंत सर्व व्यवहारपूर्ण करण्याची संधी

जळगाव तापले, तापमान ३६ अंशावर; राज्यावर अवकाळीची छाया, उद्या ‘या’ ११ जिल्ह्यांना येलो अलर्ट!

Leave a Comment