होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

LPG Price Hike: महागाईचा भडका; LPG सिलेंडरच्या किमतीत 62 रुपयांची वाढ

On: October 1, 2026 1:04 PM
Follow Us:
---Advertisement---

LPG Price Hike: सर्वसामान्यांच्या खिशाला ताण देणारी बतमी समोर आली आहे. ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसला आहे. ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी 1 ऑक्टोबर 2026 च्या सकाळी एलपीजी सिलेंडर्सच्या किंमतींमध्ये वाढ केली आहे. त्यानुसार, आता नव्या किंमती जारी केल्या आहेत. नवरात्रौत्सव काही दिवसांवरच आला असताना हा महागाईचा झटका अनेकांचं बजेट कोलमडवणारा ठरणार आहे. दरम्यान, तेल कंपन्यांनी 19 किलोंच्या कमर्शियल एलपीजी सिलेंडरच्या किंमतींमध्ये वाढ केली असून तब्बल 62.50 रुपयांनी दर वाढवले आहेत. तर, घरगुती सिलेंजर्सच्या किंमती मात्र, स्थिर ठेवण्यात आल्यात. असे असले तरी कमर्शियल एलपीजीच्या किमतीत झालेली वाढ प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या सर्वसामान्य जनतेच्या खिशाला चटका देणारी ठरेल.

तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी (LPG) सिलेंडरच्या किमतींची पुनर्रचना करतात आणि सकाळी नवे दर जाहीर करतात. त्यानुसार, ऑईल मार्केटिंग कंपन्यांद्वारे 1 ऑक्टोबर 2026 पासून वाढवण्यात आलेले कमर्शियल एलपीजी सिलेंडरच्या किंमतींवर नजर टाकली, तर राजधानी दिल्लीमध्ये 19 किलोंचा सिलेंडरचे दर 62.50 रुपयांनी वाढून आता 2 हजार 810 रुपयांवर पोहोचले आहेत. सणासुदीच्या काळात एलपीजी सिलेंडरच्या महागाईटा झटका अप्रत्यक्षपणे सर्वसामान्यांच्या खिशाला बसला आहे. एलपीजी सिलेंडरच्या महागाईचा झटका थेट हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, ढाबे आणि कॅटरिंग व्यवसायांना बसला आहे. त्यामुळे खाद्यपदार्थांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.

घरगुती सिलेंडर्सची दरवाढ नाही

तेल कंपन्यांनी 19 किलोंच्या कमर्शियल एलपीजी गॅस सिलेंडर्सच्या किमतींमध्ये वाढ केली आहे. तर घरगुती एलपीजी सिलेंडर्सच्या किंमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. म्हणजेच, 14.2 किलोंचा एलपीजी सिलेंडर जुन्याच दरांमध्ये मिळेल.

सप्टेंबरमध्ये वाढवण्यात आलेले दर

कमर्शियल गॅस सिलेंडर्सचे दर यापूर्वी सप्टेंबर महिन्यात वाढवण्यात आलेले. या दरम्यान, 9.50 रुपयांची वाढ करण्यात आलेली. ज्यामध्ये किमती वाढून 2747.50 रुपयांपर्यंत पोहोचलीय. आता आज 1 ऑक्टोबर 62.50 रुपयांची वाढ झालीय. यानंतर या किंमतींत 2810 रुपयांची वाढ झालीय.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करताय, मग टोल प्लाझाबाबत तुमचे अनुभव ‘राजमार्गयात्रा’ ॲपवर मांडा

विजयादशमीनिमित्त स्वयंसेवकांचे संचलन; आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी मांडले महत्त्वाचे मुद्दे

सागरी सुरक्षेवर भर: युद्धात ‘AI’ प्रणालींचा वापर वाढवणार- नौदल उपप्रमुखांची माहिती

‘एल निनो’च्या प्रभावाने हवामानात बदल; फेब्रुवारी महिन्यांपासूनच उष्णता जाणवणार!

मृत्यूचं तांडव: कोलकाता चँगराचेंगरीतील १९ मृत्यूंपैकी १८ जण स्थानिक तर एक बिहारी- मुख्यमंत्र्यांची माहिती; पंतप्रधान मोदी यांनी केले तीव्र दुःख व्यक्त

भारतावर १०० टक्के टेरिफ लागणार की नाही? ट्रम्प १० दिवसात ठरवणार- अमेरिकन राजदूत सर्जिओ गोर

Leave a Comment