होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Drought Update: औरंगाबादमध्ये दुष्काळाची केंद्रीय पथकाकडून पाहणी; पावसाची तूट ३५ टक्के तर, धरणसाठा ३०.७ टक्क्यांवर

On: October 9, 2026 1:48 PM
Follow Us:
---Advertisement---

Aurangabad Drought: मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने आज देमनी शिवारात पाहणी केली. देमनी येथील शेतकरी विलास देविदास शिंदे यांच्या गट ८४ मधील १ हे २० आर क्षेत्रात सोयाबीन पिकाची लागवड होती. पावसाअभावी पूर्ण पीक करपून गेले आहे. यावेळी पथकाने शेतकऱ्यांशी संवाद साधून सर्व स्थिती जाणून घेतली. यावेळी माहितीची प्रत्यक्ष पडताळणी करून अहवाल सादर करणार:असल्याचे कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे संयुक्त सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मुक्तानंद अग्रवाल यांनी सांगितले.

दोन दिवसीय दौरा

केंद्रीय पथकाकडून दि. ९ व १० ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांतील दुष्काळग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येत आहे. या पाहणीत शेतकरी, स्थानिक अधिकारी व संबंधित विभागांकडून पीक नुकसान, पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थितीबाबत प्रत्यक्ष माहिती घेतली जाणार आहे. त्याप्रमाणे आज पथकाने औरंगाबादमध्ये पाहणी केली, तसेच प्रशासनाकडून टंचाईग्रस्त भाग आणि जिल्ह्यांची माहिती घेतली.

यावेळी दौऱ्यावर आलेल्या कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे संयुक्त सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मुक्तानंद अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय पथकात महालनोबिस राष्ट्रीय पीक पूर्वानुमान केंद्राचे उपसंचालक सुनील कुमार दुबे, नीती आयोगाचे सल्लागार डॉ. जसपाल सिंग, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाच्या पशुधन अधिकारी डॉ. साक्षी भदौरिया यांचा समावेश आहे. या पाहणीवेळी राज्याचे कृषी विभागाचे सचिव परिमल सिंग जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. हे तसेच स्थानिक प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

माहितीची प्रत्यक्ष पडताळणी करून अहवाल देणार: मुक्तानंद अग्रवाल

मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्र शासनाच्या केंद्रीय पथकाला विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी आज विभागीय आयुक्तालयात विभागातील दुष्काळी परिस्थितीचे सविस्तर सादरीकरण केले. यावेळी पर्जन्यमान, पावसातील खंड, खरीप पिकांची स्थिती, पिकांचे नुकसान, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, धरणांतील पाणीसाठा, चारा तसेच उपग्रहाधारित पीक स्थिती निर्देशांकांची माहिती पथकासमोर मांडण्यात आली.यावेळी माहितीची प्रत्यक्ष पडताळणी करून अहवाल देणार असल्याचे मुक्तानंद अग्रवाल यांनी सांगितले.

कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे संयुक्त सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मुक्तानंद अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय पथकात महालनोबिस राष्ट्रीय पीक पूर्वानुमान केंद्राचे उपसंचालक सुनील कुमार दुबे, नीती आयोगाचे सल्लागार डॉ. जसपाल सिंग, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाच्या पशुधन अधिकारी डॉ. साक्षी भदौरिया यांचा समावेश आहे. याप्रसंगी राज्याच्या कृषी विभागाचे सचिव परिमल सिंग हेही उपस्थित होते.

प्रशासनाकडून पथकाला माहिती

संभाजीनगर ८ जिल्हे, ७६ तालुक्यात पावसाची तूट

छत्रपती संभाजीनगर विभागात ८ जिल्हे व ७६ तालुके असून, खरीप हंगामातील पेरणी जवळपास १०० टक्के म्हणजे सुमारे ५२ लाख हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. मात्र, रब्बी हंगामाची पेरणी आतापर्यंत केवळ ६ हजार ८०० हेक्टर क्षेत्रावर झाली आहे.

विभागात सरासरीच्या तुलनेत सुमारे ३५ टक्के पावसाची तूट असून, आतापर्यंत सरासरीच्या ६५.३५ टक्के पाऊस झाला आहे. जूनमध्ये समाधानकारक पाऊस झाल्यानंतर जुलै, ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये पावसाचे प्रमाण घटले. विशेषतः ऑगस्टमधील दीर्घ पावसाच्या खंडाचा पिकांवर परिणाम झाला. विभागातील ४९६ महसूल मंडळांपैकी ३७ मंडळांत ३० दिवसांपेक्षा अधिक, तर १५५ मंडळांत २१ ते ३० दिवसांचा पावसाचा खंड नोंदविण्यात आला आहे.

सोयाबीन, कापूस पिकांवर परिणाम

एकूण खरीप पेरणी क्षेत्रापैकी सुमारे ५६ टक्के क्षेत्रावर सोयाबीनची लागवड झाली आहे. पावसाअभावी कापसाची वाढ खुंटून पाते व फुले गळण्याचे प्रमाण वाढले असून, किडींचाही प्रादुर्भाव दिसून आला आहे. सोयाबीनच्या शेंगांमध्ये दाणे भरण्याचे प्रमाण कमी झाले असून, मका, बाजरी व उडीद या पिकांवरही परिणाम झाला आहे. जालना जिल्ह्यातील पीक कापणी प्रयोगांतून उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाल्याचे निदर्शनास आले.

धरणांतील पाणीसाठा ३०.७ टक्के

विभागातील धरणांमध्ये सध्या केवळ ३०.७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. पुढील वर्षी ऑगस्टपर्यंत पिण्याच्या पाण्यासाठी पाणीसाठा राखून ठेवण्याची आवश्यकता असल्याने यंदाच्या रब्बी हंगामातील पेरणीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. नांदेड व हिंगोली वगळता जालना, धाराशिव व लातूर जिल्ह्यांमध्ये भूजल पातळी मागील पाच वर्षांच्या सरासरीपेक्षा ४ ते ५ मीटरने खाली गेल्याची माहिती देण्यात आली.

पिण्याच्या पाण्याची संभाव्य टंचाई लक्षात घेता, पावसाची २० टक्क्यांपेक्षा अधिक तूट व भूजल पातळीत ३ मीटरपेक्षा अधिक घट झालेल्या भागांवर विशेष लक्ष देण्यात येत आहे. सध्या १९० गावे व १५७ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, ६०३ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. संभाव्य टंचाईसाठी ५ हजार १३६ टँकर व ६ हजार ९६० विहिरींचे नियोजन करण्यात आले आहे. पशुधनासाठी सध्या १२१ दिवसांचा चारा उपलब्ध असून, संभाव्य चाराटंचाईच्या पार्श्वभूमीवर चारा छावण्या सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

उपग्रहाधारित दुष्काळाच्या तीव्रतेचे मूल्यांकन

पीक व पाण्याच्या स्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी उपग्रहाधारित वनस्पती स्थिती निर्देशांक, पाण्याची उपलब्धता दर्शविणारा निर्देशांक आणि वनस्पती स्थिती निर्देशांक यांचाही आढावा घेण्यात आला. पाण्याची उपलब्धता दर्शविणाऱ्या निर्देशांकानुसार ३४ तालुके तीव्र व मध्यम श्रेणीत, तर वनस्पती स्थिती निर्देशांकानुसार १० तालुके तीव्र आणि ३४ तालुके मध्यम श्रेणीत असल्याचे सादरीकरणात नमूद करण्यात आले.

पिके वरून हिरवी दिसत असली तरी पावसातील दीर्घ खंडामुळे प्रत्यक्ष वाढ व उत्पादनक्षमतेवर परिणाम झाल्याचे या निर्देशांकांच्या आधारे निदर्शनास आणून देण्यात आले. विभागातील सुमारे ४० लाख शेतकऱ्यांपैकी ६५ टक्के शेतकऱ्यांनी पीक विमा नोंदणी केली असून, पीक परिस्थिती व नुकसानीची माहिती पीक विम्याच्या लाभासाठी उपयुक्त ठरणार आहे.

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

दुसऱ्या हल्लेखोराची बंदूक जाम झाली अन् वाचले टायगर श्रॉफचे प्राण? राजस्थान येथून तिघा संशयितांना अटक

मित्राला ‘फॉरएव्हर बाय’ म्हणून तरुणीची आत्महत्या? कुटुंबाने घाईत उरकले अंत्यसंस्कार, पोलिसांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली!

Ketan Agarwal Death Case : लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरण! अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती

छत्रपती संभाजीनगर येथे रामदास आठवले यांचा दुष्काळी पाहणी दौरा; शेतकऱ्याने मांडल्या व्यथा

मोठी बातमी: शासनाच्या ऑनलाइन सेवा ४ दिवस बंद; आज ४ वाजेपर्यंत सर्व व्यवहारपूर्ण करण्याची संधी

जळगाव तापले, तापमान ३६ अंशावर; राज्यावर अवकाळीची छाया, उद्या ‘या’ ११ जिल्ह्यांना येलो अलर्ट!

Leave a Comment