होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

विधान परिषदेच्या शिक्षक अन् पदवीधर निवडणुकीसाठी भाजप- महायुतीची प्रतिष्ठापणाला

On: October 14, 2026 4:13 PM
Follow Us:
---Advertisement---

Pune News: शिक्षक आणि पदवीधर विधान परिषद निवडणुकीसाठी भाजप-महायुती आघाडीने सर्व शक्तीपणाला लावली आहे. तसेच भाजप प्रदेशाध्यक्षांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांनी दोन दिवसांत सहा जिल्ह्यांमध्ये १० सभा घेऊन प्रचाराला गती दिली. या दौऱ्यात पुणे पदवीधर मतदारसंघातील डॉ. स्मिता जाधव आणि पुणे शिक्षक मतदारसंघातील कौस्तुभ गवाडे यांच्या निवडणूक प्रचाराला प्रारंभ केला. पुणे शहर, पुणे ग्रामीण, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांच्या कोअर कमिट्यांसोबत संघटनात्मक पातळीवर आढावा बैठका घेऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

दरम्यान, निवडणुकीच्या अनुषंगाने प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी बैठकांमध्ये मतदार नोंदणीला गती देणे, बूथ स्तरावर सूक्ष्म नियोजन करणे आणि प्रचार यंत्रणा मजबूत करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या. भाजप-महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला. सोलापूर आणि कोल्हापूरमधून अपक्ष उमेदवार नंदकुमार सागर यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आणि महायुतीला पाठिंबा दिला.

प्रदेशाध्यक्ष चव्हाण म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार युवकांना शिक्षण, करिअर आणि स्टार्टअपमध्ये संधी देण्यासाठी प्रतिबध्द आहे. शिक्षक आणि पदवीधरांच्या समस्या समजून घेत उच्चशिक्षित उमेदवार देण्यात आले आहे. सर्व कार्यकर्त्यांनी महायुतीच्या उमेदवारांना सर्व शक्तीनिशी निवडून आणण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी विविध ठिकाणी प्रचारावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, जयकुमार गोरे, शिवेंद्रराजे भोसले, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राज्य सरचिटणीस निरंजन दावखरे, राजेश पांडे आणि अनेक खासदार, आमदार व कार्यकर्ते सभांना उपस्थित होते

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

Leave a Comment