होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

कुटुंबावर काळाचा घाला: जामनेरनजीक मोटरसायकल- ट्रक अपघातात ६ ठार; मृतांमध्ये तीन बालकांचा समावेश

On: October 15, 2026 7:05 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: जामनेर तालुक्यातून एक मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. तालुक्यातील मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला असून या अपघातात दुचाकीवरील एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये तीन बालकांचाही समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे. या अपघाताच्या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

जामनेर तालुक्यातील या भीषण दुर्घटनेने परिसर हादरला असून, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मन सुन्न करणारी आहे. अपघाताचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र, गुरुवारी दुपारच्या वेळेस हा अपघात झाला आहे. जामनेर तालुक्यातील मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी यांच्यात जोरदार धडक झाली. त्यामध्ये एकाच दुचाकीवरील सहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान भीषण अपघातात मृत झालेल्या सर्व व्यक्ती मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील रहिवासी असल्याचे समजते.

अपघाताचे कारण अद्याप ही स्पष्ट झाले नसून अपघातातील सर्व मृत एकाच कुटुंबातील असल्याची माहिती समोर आल्यानं दुर्घटनेचं गांभीर्य लक्षात येतं. मृतांमध्ये तीन बालकांचाही समावेश असल्यानं परिसरात शोककळा पसरली असून या भीषण अपघातात संपूर्ण कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. उद्ध्वस्त झालं आहे. दरम्यान, हा अपघात नेमका कसा घडला, दुचाकीवर किती जण प्रवास करत होते आणि ट्रकची धडक कशा प्रकारे झाली, याबाबतची सविस्तर माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. पोलीस अधिक तपास करत आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment