Nashik News: नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे एका महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील सहकार निबंधक कार्यालयातील विशेष लेखापरीक्षक वर्ग-२ पदावर कार्यरत असलेल्या एका महिला अधिकाऱ्याने आपल्या सरकारी कार्यालयातच गळफास घेऊन आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आज सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून प्रतिभा दिलीप ठाकरे (वय ५५) असे गळफास घेतलेल्या महिला अधिकाऱ्यांचे नाव असून, या दुर्दैवी घटनेमुळे जिल्ह्याच्या प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिभा दिलीप ठाकरे (वय ५५) असे आत्महत्या केलेल्या महिला अधिकाऱ्याचे नाव असून, त्या विशेष लेखा परीक्षक वर्ग २ या पदावर कार्यरत होत्या. आज (गुरुवारी) सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून, त्यांनी कार्यालयातील लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आपले आयुष्य संपवले.

दरम्यान, महिला शिपाई कामासाठी कार्यालयात आली असता तिला प्रतिभा ठाकरे यांनी कार्यालयातील लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आपले जीवन संपवलं आहे. सकाळी साडेदहाच्या सुमारास येथील कर्मचाऱ्याना ही बाब निर्दशनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिस घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
जावयासोबत शेवटचे बोलणे झाले
बुधवारी १४ ऑक्टोबर रोजी प्रतिभा ठाकरे यांची महेश भोये या त्यांच्या जावयाशी शेवटचे बोलणे झाले होते. त्यानंतर आज सकाळी त्यांनी कार्यालयात येत आत्महत्या केली. ठाकरे यांना एक मुलगा आणि मुलगी असून, त्यांच्या पतीचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले. मुलगा सातारा जिल्ह्यातील लोनंद येथे खासगी कोचिंग क्लासेस घेत असल्याचे समजते.
मानसिक दबावामुळेच आत्महत्या?
एक महत्त्वाची माहिती अशी की, सहा कोटी रुपयांचा भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या महेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या लेखापरीक्षणाची जबाबदारी प्रतिभा ठाकरे यांच्यावर असल्यानं हे लेखा परीक्षण लवकर पूर्ण करून देण्याचा दबाव त्यांच्यावर होता, अशी चर्चा आहे. त्यामुळे त्या मानसिक दडपणाखालील मानसिक दबावामुळेच त्यांनी आत्महत्या केली असावी, असा संशय जावई भोये यांनी माध्यमांशी बोलतांना व्यक्त केला.








